ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. यावरुन त्यांच्यावर मोठ्या टीका देखील झाल्या, दुसऱ्यांना साधेपणानं लग्न करण्याचे उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या. या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना (Indurikar Maharaj) मोठा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं दिसून आले.

दरम्यान, येत्या 3 मे 2026 रोजी त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साहिल या नवऱ्या मुलासोबत विवाह होणार आहे. या विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या लग्नपत्रिकेची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना देखील मुलीच्या विवाह सोहळ्यास आमंत्रण दिले आहे.

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) हे राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते. महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन होत असते. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर , समस्यांवर ते थेटपणे अगदी मार्मिक पद्धतीने ते कीर्तनात बोलत असतात. लग्नातील अवाढव्य खर्च, बेरोजगारी यांसह अनेक विषयावर ते विनोदीशैलीत पण रोखठोक बोलत असतात.

पण जेव्हा इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुडा झाला तेव्हा त्यातील खर्च हा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला. त्यामुळे या साखरपुड्याची साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली.

दरम्यान, आता इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाहाची लग्नपत्रिका समोर आली आहे. येत्या 3 मे 2026 रोजी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप या नवऱ्या मुलासोबत विवाह होणार आहे. लग्न सायंकाळी 6.50 वाजता होणार आहे. विशेष म्हणजे त्याआधी साडेचार ते साडे सहावाजेदरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.हे कीर्तनपुष्प प.पु.गुरुवर्य ह. भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे कीर्तन होणार आहे. तर विवाहस्थळीच सायंकाळी 4 वाजता प. पु. स्वामी गगणगिरी महाराज यांच्या 8 व्या सप्ताहाचे ध्वजारोहण होईल.
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी