Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरुच; या राज्यांना उष्णतेसोबत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील हवामान विचित्र होत चालला आहे, कधी कडाक्याचं ऊन तर कधी पाऊस, ऋतुचक्र बिघडत आहे आणि याचा परिणाम म्हणून उष्माघात यांसारखे त्रास जाणवू लागले आहेत. महाराष्ट्र सध्या दोन भागात विभागाला गेला आहे, एका भागात पाऊस आणि दुसऱ्या भागात ऊन. विदर्भात उष्णेतची लाट कायम असून, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तसेच काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे.



सूर्याचा तडाखा ४४ अंश पार


राज्यात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून वर्धा, अकोला, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये पारा ४४ अंशाच्या पार गेला आहे. तसेच जळगाव, नागपूर, वाशीमध्येही तापमान ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे.



अवकाळी पाऊस का पडतोय


महाराष्ट्राच्या हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की, मध्य प्रदेशात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे, तसेच विदर्भा पासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ईशान्य भारतात समुद्र सपाटीपासून १२.६ किलोमीटर उंचीवर ताशी ९० ते १२० नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.



या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा 


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, आणि लातूर या जिल्ह्यांत सोसाट्याचा वर आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



गारपिटीचा इशारा


घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मुंबई ठाण्यात आद्रता वाढणार


पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी केवळ उष्णता नसून आद्रतेचाही त्रास होणार आहे. तसेच हलका आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर