Mojtaba Khamene : मोजतबा खामेनी सार्वजनिकरीत्या गायब, जखमी अवस्थेत गुप्त ठिकाणाहून संपर्कात

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे चिठ्ठ्यांच्या माध्यमातून इराणी सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणचे नवे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजतबा खामेनी हे सुप्रीम लीडर झाल्यापासून सार्वजनिकरीत्या दिसलेले नाहीत.अहवालानुसार, मोजतबा खामेनी आपल्या पहिल्या सार्वजनिक भाषणात कमकुवत किंवा असुरक्षित दिसू इच्छित नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव तसेच अमेरिका आणि इस्रायलच्या नजर ठेवण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याची पद्धत अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे.


मोजतबा खामेनी यांचे संदेश हाताने लिहिले जातात, लिफाफ्यात सीलबंद केले जातात आणि त्यानंतर विश्वासू दूतांच्या साखळीमार्फत पुढे पाठवले जातात. हे दूत कार आणि मोटारसायकलींनी मुख्य रस्ते तसेच आतील मार्गांचा वापर करून संदेश त्यांच्या ठिकाणी पोहोचवतात. मोजतबा खामेनेई कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नसल्याचेही सांगितले गेले आहे.



एका अहवालानुसार, वडिलांच्या निधनानंतर सत्तेची सूत्रे हाती घेतलेले मोजतबा खामेनी गंभीर जखमी असून सध्या गुप्त ठिकाणाहून काम करत आहेत. ते शुद्धीत आहेत, मात्र सार्वजनिकरीत्या समोर येत नाहीत आणि त्यांची भूमिका हळूहळू कमी केली जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.


अहवालात म्हटले आहे की, ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्रिय आहेत, मात्र शारीरिक दुखापती गंभीर आहेत. त्यांच्या एका पायावर तीन वेळा शस्त्रक्रिया झाली असून आता त्यांना कृत्रिम पायाची गरज आहे. एका हातावरही शस्त्रक्रिया झाली असून तो हळूहळू बरा होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर गंभीर भाजल्या गेल्याने बोलण्यात अडचण येत आहे आणि पुढे प्लास्टिक सर्जरीची गरज भासू शकते.



मोजतबा खामेनी यांच्याबाबतची ही माहिती अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा इराणच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वात एकमत नसल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वात अंतर्गत संघर्ष असल्याचे म्हटले होते.मात्र, इराणने हे दावे ठामपणे फेटाळून लावले आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “इराणमध्ये कट्टरपंथी किंवा उदारमतवादी असा भेद नाही. आम्ही सर्व इराणी आणि क्रांतिकारी आहोत. देशात एकजूट आहे. आम्ही आक्रमणकर्त्यांना पश्चात्ताप करायला भाग पाडू. एक अल्लाह, एक देश, एक नेता आणि एकच मार्ग… इराणचा विजय आमच्यासाठी प्राणांपेक्षाही महत्त्वाचा आहे.”

Comments
Add Comment

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी