Nashik Crime : मुलाच्या मृत्यूची भीती दाखवत विधवा महिलेवर अत्याचार, वासनांध खरातला सहाव्या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक : नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात ( Ashok Kharat Case) याची कसून चौकशी कसून चौकशी सुरु आहे. एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे त्याने केले आहे. सूत्रांनुसार, अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला खरात सरकारी डॉक्टरच्या नावाखाली गर्भपाताचे रॅकेटही चालवत होता. तपासात असे उघड झाले आहे की, पीडितांपैकी एकाने सरकारी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात करून घेतला होता.


दरम्यान भोंदूबाबा अशोक खरात ( Ashok Kharat Case) याच्या विरोधातील सहाव्या गुन्ह्याचा तपास शुक्रवार (दि. २३) पासून सुरू होत आहे. पाचव्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली असली, तरी नव्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी पुन्हा त्याला ताब्यात घेणार आहे.


मुलाच्या मृत्यूची भीती दाखवून विधवा महिलेवर अत्याचार
एका विधवा महिलेला तिच्या मुलाच्या मृत्यूची भीती घालून दैवी कोपापासून वाचवण्याच्या नावाखाली खरातने वर्षभर तिच्यावर अत्याचार ( Ashok Kharat Case) केले होते. या पाचव्या गुन्ह्यात पोलिसांनी खरातला १८ एप्रिलपासून कोठडीत घेतले होते. गुरुवारी या कोठडीची मुदत संपल्याने त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Courts) हजर करण्यात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता किरण भेंडभर यांनी युक्तिवाद करत सहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरातची पुन्हा पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने खरातला आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २६ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


खरातने पीडित महिलांचा गर्भपात करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टर व एका शासकीय अधिकाऱ्याची मदत घेतल्याचा संशय एसआयटीला आहे. या दोन ते चार डॉक्टरांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला