Mumbai : रेल्वे कर्मचाऱ्याला होमगार्डने मारली लाथ

मुंबई : लोकलमध्ये कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने रेल्वे कर्मचाऱ्याला लाथ मारल्याचा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, लाथ मारल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पश्चिम रेल्वेवर मंगळवारी चर्चगेट-बोरिवली लोकल रात्री ९:३० वाजता विलेपार्ले स्थानकावर ही धक्कादायक घटना घडली.


चर्चगेट-बोरिवली या लोकलमध्ये गार्ड चैतन्य मालवदे कर्तव्यावर होते. ही लोकल दादर येथे येईपर्यंत महिला डब्यात एकही गृहरक्षक नव्हता. लोकल दादर स्थानकावर आल्यानंतर १ गृहरक्षक महिला डब्यात चढला. तर वांद्रे स्थानकात ३ गृहरक्षक महिला डब्यात चढले. हे चारही गृहरक्षक महिला डब्याच्या दरवाजाजवळ उभे असल्याने लोकलमध्ये चढताना महिला प्रवाशांना त्रास होत होता. म्हणून चैतन्य मालवदे यांनी गृहरक्षकांना लोकल डब्यातून उतरण्यास विनंती केली. पण त्यांनी उतरण्यास नकार दिला. लोकल विलेपार्ले येथे पोहोचताच गृहरक्षक मनोज सावंत हा महिला डब्ब्यातून खाली उतरला आणि गार्ड चैतन्य मालवदे यांना शिवागाळ करत लाथ मारली.


रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक


या संतप्त घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रेल्वे कर्मचारी संघटना यांनी केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. साधारण २२ लोकल गार्ड बुधवारी गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात जमले होते. फक्त अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दुसरीकडे महिला प्रवाशांच्या डब्यात एकाचवेळी गृहरक्षक, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तैनात असतात. यामुळे महिला प्रवाशांना प्रवास करणे कठीण होते, असे बोलले जाते.

Comments
Add Comment

Ophthalmologists proposal : ड्रायव्हिंग लायसन्समध्ये नेत्रदानाची संमती नोंदवण्याची मागणी; तज्ज्ञांचा सरकारला प्रस्ताव

मुंबई : भारतामध्ये कॉर्निया प्रत्यारोपणासाठी मोठी मागणी असताना उपलब्ध नेत्रदानाचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

FDA Festive Calendar : सण-उत्सवात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी 'एफडीए'कडून वार्षिक कॅलेंडर

सर्व धर्मीयांच्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘स्थायी आदेश’ जारी मुंबई :

Sawantwadi Express : 'सावंतवाडी एक्स्प्रेस'ला उपमुख्यमंत्री शिंदे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, मंत्री नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट; खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई :

Nitesh Rane : २०२८ पासून मुंबई वॉटर मेट्रो सुरू होणार, पालघरपर्यंत विस्तार करण्याचे नियोजन; मंत्री नितेश राणे यांची माहिती

महाराष्ट्राने समुद्राकडे 'विकासाचे दालन' म्हणून पाहण्याची गरज  मुंबई : ८७७ किलोमीटरची किनारपट्टी, असंख्य नद्या

Nitesh Rane : 'शिप ब्रेकिंग पॉलिसी' अंतर्गत २०३० पर्यंत ७० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य; मंत्री नितेश राणे यांची माहिती

जहाज बांधणी, जहाज तोडणीसाठी स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य मुंबई : भारताच्या जहाज बांधणी आणि जहाज

Ashwini Bhide : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक