Devendra fadnavis : इतिहास आणि लोककथांमध्ये फरक - बागेश्वर बाबांच्या विधानावर फडणवीसांची भूमिका

- 'उबाठा'सोबतच्या 'गुप्त भेटी'चे वृत्तही फेटाळले


मुंबई : नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, इतिहास आणि लोककथा यांतील फरक ओळखणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अधिकृत ऐतिहासिक संदर्भ आणि ग्रंथांमध्ये अशा कोणत्याही प्रसंगाचा उल्लेख नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एका प्रसंगाचा उल्लेख केला होता, ज्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण ज्या ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास केला आहे, त्यात शास्त्री यांनी सांगितलेल्या घटनेचा कोणताही आधार सापडत नाही. त्यामुळे ऐतिहासिक तथ्यांची मांडणी करताना अधिकृत संदर्भांचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सूचित केले.



दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात 'वर्षा' निवासस्थानी मध्यरात्री गुप्त भेट झाल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर मी ते उघडपणे करेन, आम्हाला लपून-छपून भेटण्याची कोणतीही गरज नाही. आमच्यात असे कोणतेही विषय नाहीत जे लपवून ठेवावे लागतील."

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण