पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांपैकी १५२ जागांसाठी पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान झाले. या टप्प्यात ९३.१९ टक्के असे ऐतिहासिक मतदान झाले. उर्वरित १४२ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी आहे.


पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची धाकधूक वाढली आहे. झालेले मतदान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने आहे की विरोधात यावरून चर्चेला उधाण आले आहे.


पश्चिम बंगालमध्ये १९७७ ते २०११ या ३४ वर्षांच्या कालावधीत साम्यवादी विचारांच्या अर्थात कम्युनिस्ट विचारांच्या पक्षांचीच म्हणजेच डाव्यांची सत्ता होती. यानंतर तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आहेत. या सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली आहे. वारंवार प्रयत्न करूनही भाजपला तृणमूलचा पराभव करणे जमले नाही. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यामुळे भाजपला जिंकण्याची आशा वाटू लागली आहे.


याआधी ९ एप्रिल रोजी आसाम, केरळ आणि पुदुचेरीमध्येही विक्रमी मतदान झाले. आसामध्ये ८५.९१ टक्के, पुदुचेरीमध्ये ९० टक्के आणि केरळमध्ये १९८७ नंतरचे सर्वाधिक ७८.२७ टक्के मतदान झाले. तसेच २३ एप्रिल रोजी तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर एकाच टप्प्यात विक्रमी ८४.६९ टक्के मतदान झाले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इतिहासात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील.


पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी एकाच वेळी जाहीर केले जातील. यामुळे पाचही राज्यांमध्ये तिथले सरकार सत्ता टिकवणार की सत्तांतर होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर