Lungi Ngidi Injured : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, लुंगी एनगिडी गंभीर जखमी

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गंभीर जखमी झाला. झेल घेताना एनगिडी जखमी झाला आणि त्याला मैदानाबाहेर जाता आले नाही. त्याच्यासाठी मैदानावर स्ट्रेचर आणण्यात आले आणि त्याला रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की खेळ थांबवावा लागला.


एनगिडी पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्याचा झेल घेण्यासाठी धावला, पण त्याचा चेंडूचा अंदाज चुकला. तो जमिनीवर पडला आणि स्वतःहून उठू शकला नाही. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. एनगिडीला रुग्णालयात नेण्यात आले. त्याची अवस्था पाहता, दुखापत गंभीर असल्याचे दिसत होते, कारण तो स्वतःहून चालू शकत नव्हता.



दिल्लीविरुद्ध पंजाबने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार अक्षर तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रियांश आर्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत गेला. एनगिडीने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडू शकला नाही. तो खाली पडला आणि जमिनीवर आदळल्याने त्याचे डोके मुरगळले. त्यानंतर त्याला उठता आले नाही आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.



मैदानावर रुग्णवाहिका आणण्यात आली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. एनगिडीला करोल बाग येथील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या दुखापतीमुळे १५ मिनिटे खेळ थांबवण्यात आला. पंजाबचे क्रिकेटपटूही मैदान सोडून गेले होते. पण, एनगिडीला मैदानाबाहेर नेल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठी माहिती दिली आहे. संघाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे, "एनगिडीची प्रकृती स्थिर आहे. त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल."

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून