Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्याने सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आणि आपली प्रकृती आता ठीक असल्याचे सांगितले.


दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी झाला होता. ही घटना पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात घडली. मिड-ऑफवरून धावत येऊन झेल घेण्याच्या प्रयत्नात एनगिडीचा तोल गेला आणि तो खाली पडला, ज्यामुळे त्याच्या डोक्याच्या मागच्या भागाला जमिनीवर आपटल्याने जोरात मार लागला. दुखापत इतकी गंभीर होती की, लगेच मैदानावर फिजिओथेरपिस्टला बोलवावे लागले. वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून मानेला पट्टा (नेक ब्रेस) लावला आणि त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने, उपचारादरम्यान तो शुद्धीवर होता आणि डॉक्टरांशी बोलत होता.


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, दिल्ली वाहतूक पोलिसांनी स्टेडियमपासून रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. प्रचंड वाहतूक कोंडी असूनही, एनगिडीला केवळ ११ मिनिटांत रुग्णालयात पोहोचवण्यात आले, ज्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळाले.


सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने एनगिडीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला आणि मानेच्या मागील भागाला दुखापत झाली होती आणि त्याला बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले होते. संघाच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती आता स्थिर असून सध्या कोणताही धोका नाही. डॉक्टरांनी त्याला काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात