RR vs SRH : वैभव सूर्यवंशीचा महाविक्रम, गिलचा विक्रम मोडला

जयपूर : सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादने गोलंदाजीचा निर्णय प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकांत सहा बाद २२८ धावा केल्या तर हैदराबादने १८.३ षटकांत ५ बाद २२९ धावा करून सामना पाच विकेट आणि नऊ बॉल राखून जिंकला. या विजयामुळे सनरायझर्स हैदराबाद (०.८१५) पॉइंट्स टेबल अर्थात गुणतक्त्यात दहा गुणांसह तिसऱ्या स्थानी तर राजस्थान (०.६०२) दहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.


जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने ३७ चेंडूत १२ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०३ धावा केल्या. साकीब हुसेनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. वैभवने आयपीएल २०२६ च्या ३६ व्या साखळी सामन्यात ३६ चेंडूत शतक केले. अवघ्या १५ वर्षांच्या या फलंदाजाने प्रफुल्ल हिंगेच्या पहिल्याच षटकात चार षटकार मारून दमदार सुरुवात केली. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या खेळाडूने डावाच्या पहिल्याच षटकात चार षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ. याआधी डावाच्या पहिल्या षटकातील सर्वोत्तम कामगिरी २००९ मध्ये ब्रॅड हॉजविरुद्ध नमन ओझाने केली होती.


हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात हिंगेने वैभवला गोल्डन डक केले होते. पण यावेळी वैभवने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. फक्त सहा चेंडूत ३० धावा करणाऱ्या वैभवने ३६ चेंडूत लिलया शतक साजरे केले. आयपीएलच्या इतिहासातील दुसरे आणि तिसरे सर्वात जलद शतक वैभवच्या नावावर आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली ही सर्वात जलद दोन शतके आहेत. गेल्या वर्षी, वैभवने जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंमध्ये शतक केले होते. आयपीएलच्या इतिहासात इतर कोणत्याही खेळाडूने ४६ पेक्षा कमी चेंडूंमध्ये दोन शतके केलेली नाहीत. ख्रिस गेलने ३० चेंडूंमध्ये एक आणि ४६ चेंडूंमध्ये आणखी दोन शतके केली आहेत.


वैभवने त्याचाच सहकारी असलेल्या यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडून दोन आयपीएल शतके झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज बनण्याचा मान मिळवला आहे. आता त्याच्या नावावर चार टी-२० शतके झाली असून, या कामगिरीचा जागतिक विक्रमही त्याच्या नावावर आहे. वैभवने तिलक वर्मालाही मागे टाकले आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये चार शतके झळकावणारा जगातील सर्वात तरुण फलंदाज झाला आहे.


वैभव आता यपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ५० षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. गेलने आयपीएलच्या इतिहासात २५ डावांमध्ये ५० षटकार मारले तर वैभवने १५ डावांतच ५० षटकार मारण्याची किमया केली. आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत वैभव अग्रस्थानी आहे. याआधी हा विक्रम त्याच्या नावावर मुरली विजयसोबत संयुक्त अशा स्वरुपात होता.


चार टी २० शतके झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज


वैभव सूर्यवंशी - १५ वर्षे, २९ दिवस


तिलक वर्मा - २२ वर्षे, १५ दिवस


अभिषेक शर्मा - २३ वर्षे, ४९ दिवस


आयपीएलमध्ये सर्वात जलद ५० षटकारांचा विक्रम


वैभव सूर्यवंशी - १५ डाव


ख्रिस गेल - २५ डाव


आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार


ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया - १७ षटकार - परदेशी खेळाडू


ब्रँडन मॅक्कुलम, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १३ षटकार - परदेशी खेळाडू


ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स - १३ षटकार - परदेशी खेळाडू


वैभव सूर्यवंशी, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - १२ षटकार - परदेशी खेळाडू


ख्रिस गेल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब - १२ षटकार - परदेशी खेळाडू


एबी डी व्हिलियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात लायन्स - १२ षटकार - परदेशी खेळाडू

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त