BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेचे स्टॉल्स जर अविवाहित व्यक्तीला दिले असतील तर ते स्टॉल्स संबंधित व्यक्तीच्या आई वडिलांच्या नावे केले जातील, परंतु कोणत्याही परिस्थिती भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे.


मुंबई महापालिकेने स्टॉल्स, इत्यादींचे परवाने हस्तांतरीत करण्यासंबंधातील विद्यमान धोरणामध्ये अविवाहित परवानाधारकाचे वारस म्हणून प्रथम त्यांचे आई, वडिल आणि ते हयात नसल्यास किंवा ते काम करण्यास असमर्थ असल्यास त्या अविवाहित परवानाधारकाची बहिण व भाऊ यांचा अंतर्भाव करण्यात यावा,अशाप्रकारची मागणी झाल्याने या धोरणांत अशा तऱ्हेने बदल करण्याची मागणी झाली होती. उबाठा शिवसेनेच्या तत्कालिन सभागृहनेत्या व विद्यमान नगरसेविका विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे या धेारणात बदल करण्याची मागणी केली होती. मुंबईमध्ये दोन बाय एक मीटर क्षेत्रफळाचे स्टॉल्स चालवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवाने देण्यात आलेले आहेत. असे व्यवसाय करणाऱ्या परवानाधारकाचे निधन झाल्या किंवा तो काम करण्यास असमर्थ ठरल्यास त्या परवान्याचे हस्तांतरण केवळ त्याच्या वारसाच्या म्हणजे पती, विधवा , मुलगा, मुलगी यांच्या नावे करता येईल असे महापालिकेचे धोरण आहे. परंतु अविवाहित परवानाधारकाचे निधन झाल्यास किंवा तो करण्यास असमर्थ ठरल्यास त्याच्या नावे असलेले स्टॉल्सच्या परवान्यांचे हस्तांतरण त्यांचे वारस म्हणून आई, वडिल, भाऊ, बहिण यांच्या नावे करण्याचा या धोरणात उल्लेखच नाही, या अविवाहित व्यक्तींचे आई, वडिल, भाऊ व बहिण हेच आधार असतात. त्यामुळे या सर्वांचा परवाना हस्तांतरणाच्या धोरणात समावेश करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी मागणी केली होती.



यावर प्रशासनाच्यावतीने माहिती देताना, स्टॉल्सचा परवाना हा स्टॉल्सधारकाला स्वत:चा चरितार्थ चालविण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत परवान्यांचे हस्तांतरण हे कायदेशीर वारसा नावाने सांगण्यात येते. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या परवान्यांचे हस्तांतरण हे स्टॉल्सधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ असल्यास त्यांचे कायदेशीर नवरा, विधवा पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे करण्यात येते. पण परवानाधारकाच्या मृत्यूनंतर किंवा ते असमर्थ झाल्यास नमुद केलेले वारस नसल्यास त्यांच्या आई, वडिलांच्या नावे करण्यासाठीचे परिपत्रक माहपालिकेच्यावतीने बनवून आयुक्तांच्या स्वाक्षरीकरता सादर करण्यात आले आहे. त्यामुळे अविवाहित परवानाधारकांची बहिण व भाऊ यांच्या या धोरणात अंतर्भाव करता येणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४