Urea : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार

नवी दिल्ली : भारत आणि रशिया संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार आहेत. यासाठी एक प्रकल्प दोन वर्षांत सुरू केला जाईल, असे इंडियन पोटॅशच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


सरकारी मालकीच्या प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडियाने (PDI) व्यावहारिक पातळीवर काय शक्य आहे याची चाचपणी केली आणि सकारात्मक अहवाल सादर केला. यानंतर भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करण्यासाठी करार केला. या जॉइंट व्हेंचर अर्थात संयुक्त भागीदारी करारात भारताकडून इंडियन पोटॅश (IP), राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) आणि नॅशनल फर्टिलायझर्स (NF) या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. रशियाकडून युरलकेम ही कंपनी करारात सहभागी झाली आहे.


प्रकल्पात भारताच्या तिन्ही कंपन्यांची मिळून संयुक्तपणे ५० टक्के भागीदारी असेल तर रशियाच्या युरलकेम या कंपनीची प्रकल्पात उर्वरित ५० टक्क्यांची भागीदारी असेल.


रशियातली युरलकेम ही कंपनी खत निर्मिती क्षेत्रातली एक बलाढ्य कंपनी आहे. या कंपनीसोबत करार केल्यामुळे युरिया निर्मितीसाठीच्या संयुक्त प्रकल्पात भारताला फायदा होईल. भारतातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.


संयुक्त प्रकल्पांतर्गत रशियातील समारा येथील तोग्लियाट्टी येथे युरिया निर्मितीचा महाकाय प्रकल्प उभा राहणार आहे. प्रकल्पासाठी इंडियन पोटॅश (IP) साडेचार हजार कोटी, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) साडेचार हजार कोटी आणि नॅशनल फर्टिलायझर्स (NF) दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. उत्पादीत होणारा सर्व साठा भारत आयात करणार आहे.


इफ्को (IFFCO) आणि क्रिभको (KRIBHCO) यांनी ओमान ऑईल कंपनीसोबत संयुक्तपणे ओमान इंडिया फर्टिलायझर हा संयुक्त प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून १.६५ दशलक्ष मेट्रिक टन युरियाची निर्मिती होते. या युरियाचा खरेदीदार भारत आहे. आता रशियातल्या महाकाय प्रकल्पातून भारतासाठी वर्षाला २० लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती होणार आहे.


भारताची आर्थिक वर्ष २०२६ मधील सर्व प्रकारच्या खतांची एकूण आयात २० दशलक्ष टन पेक्षा जास्त होती. त्यापैकी १० दशलक्ष टन युरियाची आयात होती. आर्थिक वर्ष २०२६ मधील सुमारे ४० दशलक्ष टन युरियाच्या एकूण वापरापैकी, सुमारे ३० दशलक्ष टन युरियाचे उत्पादन देशांतर्गत ३२ प्रकल्पांतून झाली होती. या व्यतिरिक्त ओमान इंडिया फर्टिलायझरमधून मोठ्या प्रमाणात भारतात युरिया येत आहे. लवकरच रशियातील प्रकल्पातूनही भारतात युरिया येणार आहे.


रशियातील प्रकल्पासाठी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या उपस्थितीत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली होती. आता या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.


रशियातल्या उरालकेम समुहात उरालकेम जेएससी, उरालकाली पीजेएससी आणि टोआझ जेएससी या तीन प्रमुख रशियन कंपन्या आहेत. या कंपन्यांची एकत्रित उत्पादन क्षमता सुमारे २५ मेट्रिक टन आहे. पण रशियातल्या महाकाय प्रकल्पामुळे भारताचा युरियाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.


युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे नियोजन


जागतिक युरिया बाजारात आखाती देशांतील कंपन्यांचा वाटा ४० टक्के आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे आखाती देशांतून येणाऱ्या युरियावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पर्यायी देशांतून युरियाची आयात करण्याचे नियोजन केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीला वळसा घालून अडीच दशलक्ष मेट्रिक टन युरिया आयात करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा युरिया रशिया, अल्जेरिया, नायजेरिया आणि ओमानमधून इंडियन पोटॅश (IP) भारतात आयात करणार आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण