Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणाची आता विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी केली जाणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यासंदर्भात समिती गठित करण्याचे निर्देश दिले असून, येत्या १५ दिवसांत या प्रकरणाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश सोमवारी दिले.


विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेच्या अनुषंगाने विधानभवनात आयोजित विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अमरावतीमध्ये गरिबांसाठी राखीव असलेले भूखंड धनदांडग्यांना किंवा अपात्र व्यक्तींना विकले गेल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. बैठकीदरम्यान महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनीही या प्रकरणात अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मान्य केले. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता, केवळ प्रशासकीय चौकशी न करता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तपास होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक यंत्रणांचा समावेश असलेली समिती तातडीने स्थापन करावी, संपूर्ण चौकशी पूर्ण करून १५ दिवसांच्या आत अहवाल सभापतींना सादर करावा, चौकशीत जे अधिकारी किंवा व्यक्ती दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट