IPL 2026 : आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंगक्रिश रघुवंशीवर दंडात्मक कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल २०२६ च्या सामन्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला सामन्यादरम्यानच्या त्याच्या आक्रमक वर्तनाबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.


आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आणि यष्टीरक्षक अंगक्रिश रघुवंशीला, सामना क्रमांक ३८ मध्ये आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनासाठी त्याच्या सामना शुल्काच्या २० टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे." त्यात पुढे म्हटले आहे की, त्याने कलम २.२ चे उल्लंघन केले, जे सामन्यादरम्यान उपकरणे किंवा मैदानातील साहित्याच्या गैरवापराशी संबंधित आहे.



रघुवंशीने आपली चूक कबूल केली असून सामनाधिकाऱ्यांचा निर्णय स्वीकारला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, लेव्हल १ उल्लंघनासाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असतो. केकेआरने लखनौविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला, परंतु या विजयादरम्यान रघुवंशीचे वर्तन चर्चेचा विषय बनले. एका तरुण क्रिकेटपटूकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते आणि त्याचा संघाच्या प्रतिमेवरही परिणाम होतो.



ही घटना सामन्याच्या पाचव्या षटकात घडली, जेव्हा रघुवंशीला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल बाद देण्यात आले. या निर्णयानंतर, त्याचा संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या बॅटने सीमारेषेवरील कुशनवर प्रहार केला. इतकेच नाही, तर त्याने आपले हेल्मेट डगआऊटच्या दिशेने फेकले, जे आयपीएलच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे.

Comments
Add Comment

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

पुरूष क्रिकेटपटूंनाही जे जमलं नाही, ते स्मृती मंधाना करणार! फक्त 133 धावा करताच रचणार ऐतिहासिक महाविक्रम

[caption id="attachment_1066855" align="aligncenter" width="800"] भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 16 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड