IPL २०२६ : क्या बात ! १५ वर्षानंतर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम रिंकु सिंहने मोडला

IPL 2026  : सध्या देशात आयपीएल 2026 ची धुमधाम सुरु आहे. आयपीएल म्हणजे अनेक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. जुने रेकॉर्ड मोडून नवे रेकॉर्ड बनवणे यामुळे अनेक क्रिकेटपटू प्रकाशझोतात येत असतात. असाच पुन्हा एकदा रिंकु सिंह (Rinku Singh) प्रकाशझोतात आला आहे. आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रिंकु सिंहची खेळी महत्त्वाची ठरली. त्याच्या खेळीमुळे कोलकात्याच्या विजय तर झालाच पण या सामन्यात रिंकु सिंहने इतिहास रचला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा इतिहास रचून त्याने महेंद्रसिंह धोनीचा ( Mahendra Singh Dhoni )15 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.


लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती नाजूक होती. या सामन्यात रिंकु सिंह सहाव्या स्थानावर फलंदाजीला आला. आणि त्याने अवघ्या 51 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 83 धावा केल्या आणि इथेच त्याने इतिहास रचला. आयपीएल इतिहासात सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा मान आता रिंकु सिंहला मिळाला आहे. त्याने सहाव्या क्रमांकावर उतरून 83 धावांची खेळी केली. यासह त्याने चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला.


आयपीएल 2011 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने ( Mahendra Singh Dhoni ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) विरूद्धच्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यावेळी त्याने नाबाद 70 धावांची खेळी केली होती. हा सहाव्या क्रमांकावर वैयक्तिक सर्वोच्च धावा होत्या. पण आता रिंकुच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला आहे.


रिंकु सिंहला (Rinku Singh) सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने सांगितलं की, जेव्हा मी फलंदाजीला जातो आणि संघाच्या 3-4 विकेट्स पडलेल्या असतात, तेव्हा खेळ नियंत्रणात ठेवून तो पुढे कसा न्यायचा यावर माझं लक्ष असतं. मी स्ट्राईक रोटेट कसा करायचा, एकेरी आणि दुहेरी धावा कशा घ्यायच्या आणि चौकार कुठे मारता येतील याचा विचार करतो. खेळ शेवटपर्यंत नेणं हेच माझं मुख्य ध्येय असतं.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून