रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी घडल्या आहेत. मार्गावरील पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीदरम्यान गंगाराम टोपरे, मुकुंद सनगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीत पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष झा यांच्याकडे दोन महत्त्वाचे विषय मांडले. कोकण रेल्वेचे शिल्पकार यांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी करण्यात आली, तसेच मांडवी एक्स्प्रेस ही गाडी रात्री सुमारे साडेआठ वाजता दिवा स्थानकावर पोहोचते. ती तेथे थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.यापैकी कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक लावण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.






