Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक घडामोडी घडल्या आहेत. मार्गावरील पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी स्थानिक मागण्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पद्मश्री गजानन माने यांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी ही बैठक घडवून आणली.बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ९ साप्ताहिक गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली. त्यापैकी ५ गाड्यांच्या थांब्यासंदर्भात सकारात्मक प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार असून, त्यावर अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.प्रवाशांच्या सोयीसाठी संगमेश्वर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ व २ वर डिजिटल कोच पोजिशन इंडिकेटर बसवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे गाड्यांमधील डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे.याशिवाय, स्थानकावर दररोज तिकीट तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे.



या बैठकीदरम्यान गंगाराम टोपरे, मुकुंद सनगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बैठकीत पद्मश्री गजानन माने यांनी कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष झा यांच्याकडे दोन महत्त्वाचे विषय मांडले. कोकण रेल्वेचे शिल्पकार यांच्या नावाचा फलक स्थानकावर लावण्याची मागणी करण्यात आली, तसेच मांडवी एक्स्प्रेस ही गाडी रात्री सुमारे साडेआठ वाजता दिवा स्थानकावर पोहोचते. ती तेथे थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.यापैकी कोकण रेल्वेच्या शिल्पकारांच्या नावाचा फलक लावण्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.