Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू महिलांसाठी मोठ्या फायद्याची ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. एप्रिल महिना संपायला अबघे ३ दिवस शिल्लक आहे मात्र अद्याप लाडकी बहीण योजनेचा हफ्ता न आल्याने अनेक महिला चिंतेत आहे. ( Ladki Bahin Yojana )


लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता जमा होणे बाकी आहे , तो कधी होईल याची प्रतीक्षा महिलावर्ग करत आहे, त्यानंतर एप्रिलचा हप्तादेखील कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हफ्ते एकत्र येणार असल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे.


लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?


लाडकी बहीण योजनेचा हफ्ता साधारण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो, यावेळेस थेट लाभार्थी महिलांच्या बँक अकाऊंटवर पैसे जमा होतात. दरम्यान, आतादेखील महिनाअखेरीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. महिलांना या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एप्रिल महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे या कालावधीत कधीही पैसे दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महिलांना एका महिन्याचे की दोन महिन्याचे पैसे दिले जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana March April Installment Date)


लाडक्या बहि‍णींना किती पैसे मिळणार? (Ladki Bahin Yojana Installment Update)


लाडकी बहीण योजनेत महिलांना या महिन्यात किती पैसे मिळणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या महिन्यात फक्त एकाच महिन्याचे १५०० रुपये की दोन महिन्याचे ३००० रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा