Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा एकामागोमाग एक खात्मा! लष्कर-ए-तैबाच्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf Afridi) या लष्कर-ए-तैबा Lashkar-e-Taiba (LeT) च्या कमांडरची खैबर पख्तुनख्वा या प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी आफ्रिदीवर जवळून अनेक गोळ्या झाडल्या, त्यामुळे त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. आफ्रिदी हा लष्कर-ए-तैबा प्रमुख हाफिज सईद याचा निकटवर्तीय मानला जात होता. तपास यंत्रणा या हत्येकडे ‘टार्गेटेड ऑपरेशन'म्हणून पाहत आहेत.


या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात घडणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांची मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या महिन्यात अमीर हमजा (Amir Hamza) या LeT च्या संस्थापक सदस्यावर लाहोर येथे टीव्ही स्टेशनबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात तो जखमी झाला, मात्र बचावला.


याआधी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) प्रमुख मौलाना मसूद अझर (Maulana Masood Azhar) याचा मोठा भाऊ मुहम्मद ताहिर अन्वर (Muhammad Tahir Anwar) याचा पाकिस्तानमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.



तसेच, मार्च २०२५ मध्ये अबू कताल उर्फ कतल सिंधी यालाही झेलम येथे अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले होते. तो २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या हाफिज सईदचा जवळचा सहकारी होता.


विशेष म्हणजे, २०२३ पासून पाकिस्तानमध्ये अशा हल्ल्यांचा ट्रेंड दिसून येत आहे. २०२६ मध्येच लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित किमान ३० दहशतवाद्यांना कराची, लाहोर आणि इतर भागांमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे.


या सलग हल्ल्यांमुळे पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्कमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे