Pod Taxis In Thane And Borivali : ठाणे आणि मीरा भाईंदरमध्येही धावणार पॉड टॅक्सी; कसे असतील मार्ग जाणून घ्या?

ठाणे : मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखद आणि गारेगार होणार आहे. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या योजना या राबवल्या जात असतात. मेट्रो, बुलेट ट्रेन यानंतर आता पॉड टॅक्सी धावणार आहेत.



पॉड टॅक्सिचा अहवाल


मुंबई आणि उपनगरात लोकसंख्या वाढते आहे आणि याचा परिणाम म्हणून मुंबईतील वाहतूक सुविधा या अपुऱ्या पडत चालल्या आहेत. त्यामुळे पॉड टॅक्सिची संकल्पना राबवत सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्वावर राबवले जाणार आहे. राज्य सरकार MMRDA सोबत मिळून या या प्रकल्पाच काम करणार आहे.



या अहवालात ठाणे शहरात ४३.५ किमी लांब पॉड टॅक्सी नेटवर्क प्रस्तावित आहे. त्याशिवाय मीरा भाईंदरमध्ये ३२.५ किमी लांब नेटवर्क तयार करण्याचा प्रस्ताव मांडला गेला आहे. टप्याटप्याने काम पूर्ण होणार असून नव्या मुख्य मेट्रो मार्गिकेला जोडण्यात येणार आहे.



या ठिकाणी उभारली जातील स्थानक


ठाणे पॉड टॅक्सी शहरातील माजीवाडा, विवियाना / लेक शॉवर मॉल, मानपाडा, हिरानंदानी इस्टेस्ट, कासारवडवली, तीन हात नाका आणि शास्त्री नगर या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. ठाण्यातील पॉड टॅक्सीमुळे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होणार असून या प्रकल्पासाठी एकूण २.८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या ४३.५ किमी मार्गावर तब्बल ७२ स्थानक बांधली जाणार आहेत.



तर मीरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सिचे एकूण २९ स्थानकं असतील. २,२५६ कोटी रुपयांचा कजरच अपेक्षित असून ३२.५ किमी लांबीचा हा मार्ग आहे. मीरा रोड, भाईंदर, काशिमीरा, गोल्डन नेस्ट सर्कल, शांती पार्क, कनकिया आणि इतर रहिवासी ठिकाणांना जोडणार आहे.



पॉड टॅक्सिची क्षमता किती असते


ही पॉड टॅक्सी एलिव्हेटेड मार्गावर धावणार असून प्रत्येक टॅक्सी सेल्फ स्टिअरिंग प्रणाली असणार आहे. यात १६ - २० प्रवासी क्षमता असून ताशी ६० ते ७० किमी वेगाने प्रवास करू शकते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने