Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन


ठाणे जिल्हा जियोजन समितीच्या निधीतून प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम


ठाणे : जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या उपक्रमातून ‘ग्रामीण ते अवकाश’ हा व्हिजन प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. या शैक्षणिक सहलीला 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.


‘मिशन भरारी’ उपक्रमाचे उद्घाटन 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. इयत्ता 5 वी ते 8 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 9316 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातून 2007 विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली आणि अंतिम टप्प्यात 478 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेतून प्रत्येक तालुक्यातील सरासरी 10 विद्यार्थ्यांची निवड करून एकूण 59 विद्यार्थ्यांना या विशेष सहलीसाठी पात्र ठरवण्यात आले असून, यामध्ये 54 मराठी माध्यम आणि 5 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिंदे म्हणाले.



विद्यार्थ्यांना संशोधन, अवकाश विज्ञान, प्रयोगशाळा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. सहल कार्यक्रमानुसार 27 एप्रिल रोजी मुंबईहून तिरुवनंतपुरम येथे प्रवास होईल. 28 एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि सनसेट व्ह्यू पॉईंटला भेट दिली जाईल. 29 एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन (TERLS) आणि प्रियदर्शिनी तारांगण येथे भेट दिली जाईल. 30 एप्रिल रोजी नैसर्गिक इतिहास संग्रहालये, तर 1 मे रोजी नेपियर संग्रहालय येथे भेट देऊन परतीचा प्रवास केला जाईल.


विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राहण्याची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली असून, प्रवासासाठी वातानुकूलित बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सहलीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ब्लेझर, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅप, स्पोर्ट्स शूज, सॉक्स, ओळखपत्र आणि ट्रॉली बॅग आदी साहित्य देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा कमी पडू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे शिंदे म्हणाले. “जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून 59 विद्यार्थ्यांची निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या संस्थेत जाण्याची संधी मिळत आहे.”



ते पुढे म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी नेहमीच ग्रामीण भागातील शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर दिला. त्या विचारांनुसार हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
ही 59 विद्यार्थी सहलीवरून परतल्यानंतर त्यांनी घेतलेले अनुभव जिल्हा परिषद शाळांमधील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळे विज्ञानाविषयी कुतूहल आणि प्रेरणा निर्माण होणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. ‘मिशन भरारी’ हा उपक्रम एकनाथ शिंदे यांचा ‘ग्रामीण ते अवकाश’ हा व्हिजन प्रत्यक्षात उतरवणारा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आज या मुलांना इस्रो येथे पाठवण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखवत त्यांना निरोप दिला.



यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश मोरे, आमदार शांताराम मोरे, शिक्षक आमदार न्यानेश्वर म्हात्रे, नगरसेवक विकास रेपाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी संदीप माने आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा