Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा घसरला. आज (सोमवार २७ एप्रिल २०२६) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. प्लॅटफॉर्मवर येताना डायमंड क्रॉसिंग येथे वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला. गाडीचा वेग कमी होता त्यामुळे डबा घसरला तरी जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.



स्टेशनमध्ये प्रवेश करत असताना गाडीचा वेग कमी होता. डायमंड क्रॉसिंग येथून पुढे जात असताना वंदे भारत एक्सप्रेसच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली रुळावरून घसरली. काय झाले आहे हे लक्षात येताच तातडीने आवश्यक ते उपाय करण्यात आले. प्रवाशांना पर्यायी गाडीने पुढील प्रवासाला रवाना करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


डायमंड क्रॉसिंग भारतीय रेल्वेच्या पुणे स्टेशनवरील यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचा एक भाग आहे. तिथे रुळांचे अपग्रेडेशन नियोजीत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी