नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटदाराकडून ६ हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना वर्ग १, २ आणि ३ अशा तिन्ही श्रेणीतील अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. (Igatpuri Bribe News)


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात सतीश साहेबराव दराडे (४२, रा. मखमलाबाद), सागर सतीश रावले (३५, रा. मखमलाबाद) व रवींद्र रामनाथ गायकवाड (२९, रा. चांदशी) या तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या इगतपुरी उपविभागात कार्यरत असून, इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे ही कारवाई करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून ठेकेदारीचा परवाना घेतला आहे. त्यांनी पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीची (Grampanchayat) दोन कामे नोव्हेंबर २०२५ मध्ये मुदतीत पूर्ण केली होती. या कामाचे अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी ‘मोजमाप पुस्तिके’वर स्वाक्षरी होणे आवश्यक होते. यासंदर्भात त्यांनी संशयित स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असलेले रावले यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, बिलाच्या २ टक्के म्हणजेच १ हजार रुपये घेतल्याशिवाय संशयित सहायक अभियंता दराडे स्वाक्षरी करणार नाहीत, असे सांगितले अन त्यास दराडे यांनीही दुजोरा दिला.


दरम्यान, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. यानंतर तक्रारीची शहानिशा करुन सोमवार (दि.२७) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तडजोडीनंतर ६ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर इगतपुरी (Igatpuri) उपविभागाच्या कार्यालयात संशयितांनी हे पैसे टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले. यावेळी दराडे यांनी पैसे स्वीकारून ते कनिष्ठ सहायक असलेल्या संशयित (Suspected) गायकवाडकडे सोपवताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही अटक केली. (Igatpuri Bribe News)


विशेष म्हणजे ACB च्या या कारवाईत एकाच वेळी तीन वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यात लाचेची मागणी रावले याने केली, त्याला दराडे यांनी संमती दिली आणि पैसे गायकवाड याने सांभाळले. या तिघांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, याचा तपास एसीबी करत आहे.

Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी