Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण


मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली आहेत. त्यामुळे टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडू शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. या टाक्यांची स्वच्छता शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर व्हायरल झालेला संदेश हा खोटा आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाख्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.



सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्राद्वारे कळविले आहे की, मागील चार-पाच दिवसांपासून विविध माध्यम तसेच समाजमाध्यमांवर तसेच मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर एक संदेश व्हायरल झाला असून ज्यामध्ये मंत्रालयाच्या टाकीमध्ये मांजर मरुन पडल्याचा खोटा संदेश फिरत असल्याचे निदर्शनास आले असून जो खोटा आहे.


गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या सिंटेक्सच्या टाक्या चेक केल्या असून, सदरच्या टाक्या ह्या १० फूट ते १२ फूट उंच असून सर्व टाक्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार साधारणता १० ते १५ किलो वजनाची लोखंडी झाकणे बसविलेली आहेत, जी पूर्ण वेळ बंद असतात. तसेच मंत्रालयाच्या टेरेसवरील प्रवेश दरवाजा सुध्दा कायम बंद असतो, काही दुरुस्तीची व अत्यावश्यक कामे करावयाची असल्यासच सदर दरवाजा उघडला जातो.



अशा परिस्थितीमध्ये टेरेसवर किंवा पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडूच शकत नाही आणि पडलेले सुध्दा नाही. तसेच मंत्रालयाच्या तळ जमिनीखालील पाण्याच्या टाक्या देखील शनिवार दिनांक २५ एप्रिल २०२६ व रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी साफ करण्याचे काम हाती घेण्यात आलेले होते व सर्व टाक्या चेक करुन साफ केलेल्या आहेत, त्यामुळे अशा कोणत्याही पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडलेले किंवा मेलेले नाही. सदर वायरल झालेला संदेश हा खोटा आहे, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन