Nashik : टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, पीडितेचं नाव बदललं अन्....

नाशिक : नाशिक शहरातील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात थेट मलेशिया कनेक्शन उघड झाले आहे. एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्या प्रकरणात पीडित फिर्यादीचे नाव बदलून तिला थेट मलेशियात पाठविण्याचा ‘मास्टर प्लॅन’ संशयितांनी आखल्याचे खळबळजनक वास्तव न्यायालयात मांडण्यात आले आहे.


देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात पसार संशयित निदा एजाज खान हिने नाशिकरोड न्यायालयात (Nashik Road Jail)अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत अजय मिसर यांनी तब्बल चार तास युक्तिवाद करत या प्रकरणातील गंभीर बाबी न्यायालयासमोर मांडल्या. निदा ही तीन महिन्यांची गर्भवती असली, तरी तिच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप पाहता तिला अद्याप अटकेपासून दिलासा देण्यात आलेला नाही.


निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर २ मे रोजी सुनावणी


न्यायालयात या प्रकरणातील युक्तिवादातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयितांनी पीडित तरुणीचे नाव बदलून ‘हानिया’ असे केल्याचे उघड झाले असून संशयित दानिश हा आधीच विवाहित असल्याचे पीडितेला समजल्यानंतर, तिला शांत करण्यासाठी किंवा प्रकरणापासून दूर नेण्यासाठी मलेशियात पाठविण्याचे आमिष दाखविले. तसेच निदा हिला पसार असताना कोणी आर्थिक मदत केली? यामागे कोणती मोठी साखळी आहे का? याचा तपास करण्यासाठी निदाची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची मागणी सरकारी पक्षाने केली. संशयित निदा एजाज खान हिच्या अटकपूर्व जामिनावर आता २ मे रोजी अंतिम निकाल दिला जाणार आहे. (Nashik TCS Case )


दरम्यान, संशयित दानिश शेख याने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र सुनावणीपूर्वीच ‘एसआयटी’ने त्याला अटक केल्याने त्याचा अर्ज न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव निकाली काढला आहे. तर, संशयित शाहरुख, तौसिफ आणि रझा कोठडीत असून पीडितेचे धार्मिक फोटो आणि व्हिडिओ विशिष्ट ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’वर शेअर करणाऱ्या या तिघांसह दानिश सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. तर कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी, आसिफ अन्सारी आणि शफी शेख हे नाशिकरोड कारागृहात (Nashik Road Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण