खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक फसवणूक , लैंगिक अत्याचार , धमकी अशा स्वरुपाची गंभीर प्रकरणे भोंदूबाबांची समोर आली आहेत. दरम्यान आता श्रीरामपूर मध्ये देखील असाच एक भोंदूबाबा समोर आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपाखाली या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. नाशिकचा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat), संगमनेरचा राजेंद्र गाडगे यांचे प्रकरण गाजत असतानाच आता बेलापूर नजीकच्या बाबास अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर परिसरातील पीडित महिला सन 2023 मध्ये पोटातील अल्सरच्या त्रासाने त्रस्त होती. यावेळी बेलापूर परिसरातील खटकाळी येथील गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज (Ganesh Shinde) हे आजारांवर उपचार करतात, अशी माहिती मिळाल्याने ती त्याच्या संपर्कात आली. सुरुवातीला लिंबू, उदी देत पाण्यात मिसळून पिण्यास सांगितले गेले. त्यानंतर काहीसा फरक जाणवल्याचे सांगत आरोपीने महिलेकडून 15 हजार रुपयांची मागणी केली आणि पुढील उपचारासाठी पुन्हा येण्यास सांगितले.


पाच दिवसांनी महिला पुन्हा गेल्यानंतर आरोपीने प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा व उदी मिश्रित पदार्थ खाण्यास दिला. तो घेतल्यानंतर महिलेला चक्कर आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने तिला घराच्या मागील खोलीत नेऊन दरवाजा बंद केला. तेथे पुन्हा औषधाच्या नावाखाली पेय देऊन तिची शारीरिक स्थिती कमकुवत केल्याचा आरोप असून, त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर आरोपीने फोनद्वारे धमक्या देत, उपचार पूर्ण न झाल्यास आजार वाढेल, असा धाक दाखवून महिलेला वारंवार आश्रमात बोलावले.


बदनामीची भीती आणि आजार बळावण्याच्या धास्तीमुळे पीडितेला इच्छेविरुद्ध जावे लागत होते. प्रत्येकवेळी महाराज दक्षिणा म्हणून पैसे किंवा सोन्याची मागणी करत होता. आतापर्यंत सुमारे 18 ते 20 लाख रुपये घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तसेच, ऑगस्ट 2025 मध्ये महिलेच्या घरी आणि जानेवारी 2026 मध्ये आश्रमात पुन्हा धमकावून तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


या तक्रारीवरून आरोपी गणेश माधवराव शिंदे उर्फ गणेश महाराज (Ganesh Shinde) याच्याविरुद्ध बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या भोंदू बाबाची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. बदनामीची भीती आणि आजार बळावण्याच्या धास्तीमुळे पीडितेला इच्छेविरुद्ध जावे लागत होते. प्रत्येकवेळी महाराज दक्षिणा म्हणून पैसे किंवा सोन्याची मागणी करत होता. आतापर्यंत सुमारे 18 ते 20 लाख रुपयांना या बाबाने महिलेस गंडा घातल्याचेही पुढे आले आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी