APMC Market : कलिंगड खाल्ल्याने मृत्यूच्या घटनेचा फटका; वाशी APMC मध्ये कलिंगड विक्री ठप्प! व्यापारी आणि शेतकरी चिंतेत

नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे गंभीर पडसाद आता नवी मुंबईतील वाशी येथील APMC (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक फळ बाजारात उमटताना दिसत आहेत. बाजारात कलिंगडाची आवक होऊनही ग्राहकांकडून मागणी नसल्याने विक्री जवळपास ठप्प झाली आहे.



विक्रीवर झालेला परिणाम


वाशीच्या घाऊक बाजारपेठेत आज साधारणपणे ३,३२५ क्विंटल कलिंगडाची आवक झाली आहे. मात्र, पायधुनी येथील घटनेमुळे ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली आहे. फळांच्या मागणीत मोठी घट झाल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. कलिंगडाचा दर १२ ते १८ रुपये किलो इतका कमी असूनही त्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.



व्यापाऱ्यांची मागणी


या घटनेमुळे कलिंगड व्यावसायिकांवर संक्रांत आली असून, अनेक दिवसांचा माल पडून राहिल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात बोलताना एका फळ व्यापाऱ्याने सांगितले की, पायधुनी येथील घटनेनंतर बाजारात भीतीचे वातावरण आहे. लोक कलिंगड खरेदी करायला धजत नाहीत. ही परिस्थिती पाहता शासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा. जेणेकरून ग्राहकांच्या मनातील भीती दूर होईल आणि बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल. सध्या ग्राहक कलिंगड खाणे टाळत असल्याने याचा थेट फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी दिलेल्या प्रतिक्रियेने वेधले अनेकांचे लक्ष

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आता केंद्रीय अन्वेषण

India A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 'अ' संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा २४ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणारा महत्त्वपूर्ण दौरा, युवा क्रिकेटपटूंना

ICC Test Rankings : गिल-बुमराहच्या क्रमवारीत घसरण, पडिक्कलची मोठी झेप

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली

Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत

मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा