Ladki Bahin, Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'लाडकी बहीण' चित्रपटाचा टीझर लॉन्च

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत 'लाडकी बहीण' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार संदीप क्षीरसागर, शितल म्हात्रे मॅडम, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री योगेश कदम आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.



टीझर लॉन्च दरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून, महाराष्ट्र शासनाच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आणि इतर लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत कसा पोहोचत आहे, याचे जिवंत दर्शन घडवणारा आहे." उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती केली की, "येत्या १५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सर्वांनी सहकुटुंब थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा. शासन आपल्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे आहे आणि या योजनांचा फायदा घेऊन आपण आपले जीवन कसे समृद्ध करू शकतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे."



राज्यातील महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा 'लाडकी बहीण' हा चित्रपट येत्या १५ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शासनाच्या विविध योजनांची माहिती रंजक पद्धतीने मांडली गेल्याने प्रेक्षकांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'लाडकी बहीण' चित्रपटाच्या दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. शेखर मते या चित्रपटाचे सहनिर्माते असून बाबासाहेब पाटील कार्यकारी निर्माते आहेत. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, संजय खापरे, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, शंभो महाजन, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत.

Comments
Add Comment

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

Paro Film : ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ चित्रपट लवकरच; वधू तस्करीचा विषय मांडणारा नवा सिनेमा

महिलांची वधू म्हणून खरेदी-विक्री आणि त्यातून होणारे शोषण या गंभीर सामाजिक समस्येवर भाष्य करणारा ‘पारो: वधू

शिक्षकांच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा ‘कबीर सर का आखरी लेसन’ इफ्फीमध्ये झळकला

काळ बदलला, वर्ग बदलले, फळ्याची जागा स्मार्ट बोर्डने घेतली. पण या बदलत्या काळात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक मात्र

Fulwara Marathi Movie: 'फुलवरा'चा लावणीसाज! वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नव्या लूकची चर्चा

Fulwara Marathi Movie: रवी जाधव दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘फुलवरा’ या चित्रपटाची उत्सुकता आता

Tu Aahes Na: इफ्फीच्या मंचावर मराठी चित्रपटाची भावुक झलक! ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद

Tu Aahes Na: गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे लव फिल्म्स फिल्म्सची

ऑस्कर 2027 च्या शर्यतीत 2 भारतीय चित्रपट! 'गोंधळ' आणि 'अँग'ने मिळवली पात्रता

Oscars 2027 : भारतीय चित्रपट 'गोंधळ' आणि 'अंग' यांनी ऑस्कर 2027 च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'गोंधळ'ला आंतरराष्ट्रीय फीचर