Dharashiv : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच गोंधळ, महिलेनं अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

Dharashiv : धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40 वर्षीय महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेबी किसनराव पाटील असे या महिलेचे नाव असून, त्या भूविकास बँकेच्या कर्मचारी आहेत. महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यातच हा प्रकार घडल्याने परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. (Dharashiv Bhuvikas Bank female employee poured petrol)


टोकाचे पाऊल का उचलले ?


बेबी किसनराव पाटील या ४० वर्षीय महिला भूविकास बँकेच्या कर्मचारी आहेत. शासकीय सेवेत पुन्हा सामावून घेण्यासाठी त्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल ओतून घेत त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये त्या 70 टक्के भाजल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी त्या भूविकास बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होत्या. अनुकंपा तत्वावर त्यांना भूविकास बँकेत नोकरी मिळाली होती. इतर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तर पाटील यांना थकीत वेतन आणि इतर प्रलंबित लाभ मिळालेले नाहीत. त्यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने आणि सरकार दरबारी दाद मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. (Dharashiv Bhuvikas Bank female employee poured petrol)


महिला गंभीर जखमी


1 मे रोजी ध्वजारोहणचा कार्यक्रम सुरू असतानाच बेबी पाटील यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यावेळी पोलिसांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. पाटील यांना सध्या उपचारासाठी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.(Dharashiv News)


जिल्हा उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


भूविकास बँका बंद (Dharashiv Bhuvikas Bank ) झाल्यानंतर इतर सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी मागील तीन वर्षापासून महिलेचे प्रयत्न सुरू आहेत. तर आता जिल्हा उपनिबंधक यांच्यावर महिलेच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आत्मदहनामध्ये भाजलेल्या महिलेवर धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहे. महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा