Nashik : नाशिककरांनो तिकडे जाऊच नका ! रस्ते कामामुळे 'या' रस्त्यांवर ३ महिने 'नो एन्ट्री'

नाशिक: नाशिक शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद आहे. त्यातच आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रमुख रस्त्यांचे काम करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर बदल करण्यात येणार आहेत. यामुळे नाशिककरांच्या वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल केला जाणार आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉईंट ते एक्स्लो पॉईंट या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. या रोड ऐवजी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.


अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉईंट ते एक्स्लो पॉईंट या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू आहे. कामाची मुदत देखील संपली आहे मात्र हे काम अद्याप सुरू आहे. 30 एप्रिलपासून पुढचे तीन महिने पुन्हा वाहतूक मार्गामध्ये बदल केले जाणार आहे. त्यामुळे काम होईपर्यंत वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.


अंबड औद्योगिक वसाहतीतील गरवारे टी पॉईंट कडे जाणाऱ्या वाहनांना दुभाजकाच्या विरूद्ध बाजूच्या मार्गाने आणि विविध औद्योगिक कंपन्यांच्या मार्गाने वळवण्यात आले आहे. एक्स्लोकडून गरवारेकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.एक्स्लो पॉईंटकडून गरवारे टी पॉईंटकडे जाणारी वाहतूकही बंद करून ती पर्यायी मार्गाद्वारे वळवण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे बदल करण्यात येणार आहेत. गरवारे टी पॉइंटकडून एक्स्लो पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. एक्स्लो पॉइंटकडून गरवारे टी पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर गरवारे ते एक्स्लोकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. एक्स्लोकडून गरवारेकडे येणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.


मग पर्यायी मार्ग कोणते ?


- गरवारे टी पॉइंटकडून एक्स्लो पॉइंटकडे जाणारी वाहने दुभाजकाच्या उजव्या बाजूच्या मार्गावरून गरवारे टी पॉइंट क्रॉम्प्टन कंपनीकडे जातील.


- गरवारेकडून एक्स्लोकडे जाणारी वाहने ग्लॅक्सो कंपनी टी पॉइंट, सिमेन्स कंपनी, पॉवर हाउस टी पॉइंट, नेटविन कंपनी, आरपी स्वीट टी पॉइंट, नाशिक क्लस्टर कंपनी येथून दुभाजकाच्या डाव्या बाजूने एक्स्लो पॉइंटमार्गे पपाया नर्सरीकडे वळविण्यात आली आहेत.


- एक्स्लो पॉइंटकडून गरवारेकडे येणारी वाहने एक्स्लो पॉइंटवरून डावीकडे वळून प्रणव स्टॅम्पिंग, टेक्नोफोर्स कंपनी, अजिंठा हॉटेल, आकाश उद्योग टी पॉइंट, इलेक्ट्रो स्कीम कंपनी, सेंट्रल वेअर हाउस, संजीवनी बोटॅनिकल, महेश कंपनी, डेल्टा कंपनी, जेमिनी इन्फोटेक, एबीबी कंपनी, हॉटेल उत्सव टी पॉइंट, टाल्को इंडिया कंपनी, रेन्बो कंपनी, अरिहंत अल्युमिनियम कंपनी, हॉटेल वेलकम मार्गे एनएच-३ हायवे सर्व्हिस रोडने गरवारे टी पॉइंटकडे वळविण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण