Sunetra Pawar : बीडमध्ये ध्वजारोहण करताना सुनेत्रा पवार भावूक, अजितदादांच्या आठवणीने पाणावले डोळे!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण सोहळे आयोजित करण्यात आले होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने शासकीय ध्वजारोहण केले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.



अजित पवार हयात असताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते आणि महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण नेहमी त्यांच्याच हस्ते होत असे. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या प्रथमच बीड दौऱ्यावर आल्या होत्या. प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्यानंतर जेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा अजित पवार यांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. या भावूक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.





पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी सर्वप्रथम राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. यानंतर बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. अत्यंत भावूक होत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावनिक आहे. आज मी येथे ध्वजारोहण केले आहे. बीडच्या तमाम जनतेला मी एवढेच सांगू इच्छिते की, दादांनी या जिल्ह्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती, जे 'ड्रीम प्रोजेक्ट्स' हाती घेतले होते, ते सर्व पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन. बीड जिल्ह्याला महाराष्ट्रातील एक अव्वल आणि प्रगत जिल्हा म्हणून पुढे आणण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन."

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने