Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचाच आहे का, याची शाश्वती ग्राहकांना नसते. हीच अडचण ओळखून आम्ही कोकणातील 'जी.आय. टॅग' मानांकित अस्सल हापूस थेट दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी केले.



महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या 'कोकण हापूस आंबा महोत्सवाचे' उद्घाटन आज त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल,सहसंचालक, कृषी विभाग शिवाजी आमले , सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी अभियंता आशुतोष दिवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते. उद्घाटनानंतर महोत्सवातील स्टॉल्सची पाहणी करताना श्रीमती आर. विमला म्हणाल्या की, कोकणच्या मातीत पिकलेला अस्सल हापूस आंबा ग्राहकांना मिळेल, याची आम्ही पूर्ण खात्री केली आहे.ग्राहकांना अस्सल हापूसची चव यनिमित्ताने मिळणार आहे.


श्रीमती आर. विमला यांनी दिल्लीकरांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, पुढच्या वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि जास्त दिवसांसाठी आयोजित करण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Delhi Building Collapse : दिल्लीच्या सत्य निकेतनमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या

Haryana Viral Video : हरियाणात महिलेचा रस्त्यावर हंगामा; Ola चालकावर दारू फेकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

हरियाणा : हरियाणातील एका वर्दळीच्या रस्त्यावर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM Narendra Modi : एसआरसीसीच्या शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; विद्यार्थ्यांशी व प्रवाशांशी साधला संवाद

नवी दिल्ली : दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (SRCC) शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी

Apple Maps वर आता Ads! आयफोन युझर्सची चिंता वाढली; पाहा काय बदलणार ?

मुंबई : आयफोन (Iphone) वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिग्गज तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल'ने (Apple) आपल्या 'ॲपल

Operation Ashdar : 'पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!'; बुडगाममध्ये 'ऑपरेशन अशदर' अंतर्गत लष्कर-ए-तय्यबाचा पाकिस्तानी दहशतवादी ठार

बुडगाम : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बुडगाम जिल्ह्यात (Budgam) सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका मोठ्या संयुक्त मोहिमेत

PM Modi Teachers Day Speech : शिक्षक दिनानिमित्त PM मोदींचा शिक्षकांशी मनमोकळा संवाद; 'स्क्रीन टाईम' आणि ड्रग्जच्या वाढत्या धोक्यावर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी