PM Narendra Modi : एसआरसीसीच्या शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; विद्यार्थ्यांशी व प्रवाशांशी साधला संवाद

नवी दिल्ली : दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (SRCC) शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त एसआरसीसीचा शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मोदींनी मेट्रो प्रवासादरम्यान विद्यार्थी आणि इतर प्रवाशांशी संवाद साधला. (PM Narendra Modi)


मेट्रो प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना दिसले. त्यांनी प्रवाशांशी हस्तांदोलन करून त्यांची विचारपूस केली. या अनपेक्षित भेटीमुळे नेहमीचा मेट्रो प्रवास प्रवाशांसाठी विशेष ठरला. मोदींच्या हातात मेट्रो कार्ड असल्याचेही दिसून आले. (PM Narendra Modi)



SRCCचा १०० वर्षांचा प्रवास


श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, यंदा संस्थेने १०० वर्षे पूर्ण केली आहेत. वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये एसआरसीसीचा समावेश होतो. शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी एसआरसीसीच्या योगदानाचे कौतुक केले. या संस्थेने व्यवसाय, सार्वजनिक जीवन आणि समाजातील विविध क्षेत्रांसाठी अनेक पिढ्यांतील नेतृत्व घडवले असल्याचे त्यांनी नमूद केले. सोहळ्यादरम्यान एसआरसीसीच्या शताब्दीनिमित्त १०० रुपयांचे स्मरणार्थ नाणेही जारी करण्यात आले. (PM Narendra Modi)


विशेष म्हणजे, मोदी यांचा एसआरसीसीशी जुना संबंध आहे. २०१३ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती. आता १३ वर्षांनंतर पंतप्रधान म्हणून ते पुन्हा एसआरसीसीमध्ये पोहोचले. मेट्रो प्रवास आणि SRCCच्या शताब्दी सोहळ्यातील सहभागामुळे पंतप्रधान मोदींच्या या दिल्ली दौऱ्याची चांगलीच चर्चा होत आहे. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment

Haryana Viral Video : हरियाणात महिलेचा रस्त्यावर हंगामा; Ola चालकावर दारू फेकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

हरियाणा : हरियाणातील एका वर्दळीच्या रस्त्यावर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Apple Maps वर आता Ads! आयफोन युझर्सची चिंता वाढली; पाहा काय बदलणार ?

मुंबई : आयफोन (Iphone) वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिग्गज तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल'ने (Apple) आपल्या 'ॲपल

Operation Ashdar : 'पळू शकता, पण लपून राहू शकत नाही!'; बुडगाममध्ये 'ऑपरेशन अशदर' अंतर्गत लष्कर-ए-तय्यबाचा पाकिस्तानी दहशतवादी ठार

बुडगाम : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) बुडगाम जिल्ह्यात (Budgam) सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका मोठ्या संयुक्त मोहिमेत

PM Modi Teachers Day Speech : शिक्षक दिनानिमित्त PM मोदींचा शिक्षकांशी मनमोकळा संवाद; 'स्क्रीन टाईम' आणि ड्रग्जच्या वाढत्या धोक्यावर व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी

Kerala Thrissur Car Accident : अंधार, अतिवेग अन् रस्त्यावरील निष्काळजीपणा! त्रिशूरमधील अपघातात तमिळनाडूच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

त्रिशूर : मध्य केरळमधील त्रिशूर (Keral, Thrissur) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर शुक्रवारी रात्री उशिरा एक अत्यंत

कृष्णाच्या वेशभूषेत सजवलं, पण 'ती' एक चूक जीवघेणी ठरली, ६ वर्षीय आर्यनचा दुर्दैवी मृत्यू

Bihar : जन्माष्टमीचा सण म्हटलं की, घराघरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. अनेक पालक आपल्या मुलांना लाडक्या