vaibhav suryvanshi : वैभवची फटकेबाजी पाहून जोस बटलरही थक्क; म्हणाला – हा खेळाडू आहे की AI?

IPL 2026 मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवणारा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूच्या कामगिरीने इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलर देखील थक्क झाला आहे. तो म्हणाला की, हा खेळाडू आहे की एआय. त्याच हे वक्तव्य सध्या क्रिकेटविश्वात व्हायरल होत आहे.


नेमकं काय म्हणाला जोश बटलर ?


एका पॉडकास्टमध्ये बोलताना बटलरने सांगितले की, त्याने राजस्थानच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मेसेज करून विचारले होते, हा मुलगा खरा आहे की AI ? मस्कने असा एखादा खेळाडू तयार केला आहे का ? त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीचे कौतुक करताना बटलर म्हणाला, साधारणपणे प्रशिक्षक 15 वर्षांच्या खेळाडूंना चेंडू नीट पाहून खेळायला सांगतात. पण वैभव पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळ करतो आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतो.


IPL 2026 मध्ये वैभवची कामगिरी


यंदाच्या हंगामात वैभवने फक्त आठ सामन्यांत ४०० धावांचा टप्पा गाठला आहे. यात हैदराबाद विरुद्ध 37 चेंडू मध्ये शतक ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने बुमराह, हेझलवूड आणि कमिन्स यांसारख्या जगातील अव्वल गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. वैभव ने आठ सामान्यत 37 षटकार मारले आहेत. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 71 वेळा चौकार मारले आहेत. अवघ्या 167 चेंडूंमध्ये 400 धावा पूर्ण करत आंद्रे रसेलचा 188 चेंडूंमध्ये 400 धावांचा विक्रम त्याने मोडला आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK Cricket Match : शेफालीचा सिक्स फातिमाच्या जिव्हारी! विकेट घेताच पाकिस्तानी कॅप्टनने केलं आक्रमक सेलिब्रेशन, टीव्ही अँकर विवेक राजदान म्हणाले...

वुमेन्स आशिया कप २०२६ मधील ९ व्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. रोमांचक लढत

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! इंग्लंड दौऱ्यावर पीसीबीने जप्त केले खेळाडूंचे मोबाईल फोन; मॅच फिक्सिंगचा संशय?

Pakistan Team Crisis: पाकिस्तान क्रिकेट बोर्डा

Harmanpreet Kaur : भारत-पाकिस्तान सामन्यात हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक विक्रम; १५० T20I सामन्यांत कर्णधारपद भूषवणारी पहिली क्रिकेटपटू

दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय

India vs Japan T20 : भारत-जपान पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर; २२ सप्टेंबरला ऐतिहासिक टी-२० सामना

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी एक मोठी घोषणा केली.बीसीसीआयच्या

Ind vs Pak Women's Asia Cup 2026 : महामुकाबल्याचा काऊंटडाऊन! महिला आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल? वाचा सविस्तर

दुबई : महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत आधीच उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर भारतीय महिला संघ आता आपल्या साखळी फेरीतील

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर