Dipali Sayyed On 'Raja Shivaji': ‘राजा शिवाजी’ पाहून दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “... प्रत्येक व्यक्तीने चित्रपटगृहांत हा चित्रपट पहावा!”

मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची प्रचंड चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत मराठी आणि हिंदी आवृत्त्यांमधून एकूण ११.३५ कोटींची कमाई केली आहे.


महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आयोजित ‘प्रीमियर शो’ला बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातील टॉप ५ मध्ये पोहोचलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.



दिपाली सय्यद म्हणाल्या, “महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मी काल ‘राजा शिवाजी’चा प्रीमियर पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटतं की हा एक अत्यंत अप्रतिम सिनेमा आहे. रितेश विलासराव देशमुख उर्फ भाऊ यांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चित्रपटाबद्दल अनेकांनी ट्रोल केलं होतं, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर तसं काहीही वाटलं नाही, प्रत्यक्षात सिनेमा अप्रतिम आहे.”





त्या पुढे म्हणाल्या, “चित्रपटातील प्रत्येक भूमिका, शिवराय, जिजाऊ, सई माता, अफजलखान आणि स्वतः शिवाजी महाराजांचा रोल रितेश देशमुखांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे. महाराजांनी आपल्यासाठी जे केलं, त्या महान व्यक्तिमत्त्वावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळे रितेशजींचं मनापासून कौतुक वाटतं. प्रत्येकानं घराच्या बाहेर निघून हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. सगळ्यांना विनंती करेन एकाही व्यक्तीने हा चित्रपट बघणं सोडू नये. चित्रपटगृहांत हा चित्रपट पहावा.” अशी विनंतीही त्यांनी केली.



दरम्यान, प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर चित्रपटातील दृश्ये, संवाद आणि अभिनय यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अनेकांनी या चित्रपटाला भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतही चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’