एक्स्टॅसी पुरवणारा खेमलानी अटकेत, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांची कारवाई

मुंबई : नामांकित महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्स्टॅसी हे पार्टी ड्रग्ज विक्रीसाठी पुरवणारा प्रमुख आरोपी महेश खेमलानी यास वनराई पोलिसांनी शुक्रवारी १ मे रोजी अटक केली. नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित कॉन्सर्टदरम्यान मद्य आणि एक्स्टॅसीच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मिरा रोड येथे राहणारा महेश बँकॉक येथे पसार झाला. त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी देशातील सर्व विमानतळांना लूक आऊट नोटीस जारी केली होती.


शुक्रवारी सकाळी तो मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला अडवून ठेवले. विमानतळावरून ताब्यात घेत वनराई पोलिसांनी महेशला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या महेशचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. त्याच्याकडे तेथील नागरिकत्व आहे. याप्रकरणी अटक केलेल्या आयुष साहित्य, शुभ अग्रवाल, विनीत गिरेलानी आदी विद्यार्थ्यांना महेशने एक्स्टॅसी साठा पुरवला होता. त्याची विक्री करून येणारी रक्कम प्रेयसी जिया जेकबच्या बँक खात्यावर पाठवण्याची सूचना महेशने या विद्यार्थ्यांना केली. जियाच्या खात्यावर अलीकडच्या काळात तब्बल ५० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आर्थिक तपासणीतून पुढे आली. हे सर्व व्यवहार महेशच्या सांगण्यावरून झाल्याचे तिने चौकशीत पोलिसांना सांगितले. याप्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपी महेशने एक्स्टॅसीचा साठा कोठून आणला, कोणी पुरवला की हा साठा त्याने स्वतःच तयार केला, त्याचा अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आहे का, भारतात कोणा कोणाला, कोणत्या शहरात त्याने हे पार्टी ड्रग्ज पुरवले, याबाबत कसून चौकशी सुरू असल्याचे वनराई पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण