अखेर 'त्या' कंपनीविरोधात जळगाव मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेला (Jalgaon City Municipal Corporation) कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंपनीविरोधात अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘ॲटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया)’ विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर या कारवाईला वेग आला.


अटलांटा गैरव्यवहार प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. काही दिवसांपूर्वीच या कंपनीने महापालिकेवर दावा करून 11 कोटी रूपयांची भरपाई मागितली. यावर नगरसेवक अरविंद देशमुख, अ‍ॅड.दिलीप पोकळे आणि अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी न्यायालयात त्रयस्थ अर्जदार म्हणून दाद मागितली. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत अटलांटा कंपनीला अकरा कोटी रूपये देण्याचा निकाल दिला आणि यानुसार महापालिकेने ही रक्कम अदा केली.


मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपणानंतर कारवाईला वेग


काही दिवसांपूर्वी अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात अटलांटा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि लागलीच मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर शुक्रवारी रात्री महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.


या फिर्यादीनुसार अटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया कंपनीला 1996-97 ते 2001-02 या कालावधीत डांबरीकरणासह अन्य कामांचे तब्बल 256 कार्यादेश प्रदान करण्यात आले होते. यातील कामांचा अ‍ॅडव्हान्स म्हणून तब्बल 24 कोटी 38 हजार 480 रूपये प्रदान करण्यात आले होते. यात कंपनीने 19 कोटी 55 लाख 58 हजार 86 रुपये केलेल्या कामाचे म्हणून वसूल करण्यात आले तर कंपनीकडे 4 कोटी 79 लाख 42 हजार 394 रूपये 2001-02 पासून थकीत होते. यावर महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली असता सदर कंपनीने 11 जून 2005 रोजीच्या पत्रातून आपल्याकडे थकबाकी असल्याचे मान्य केले होते.


या थकीत रकमेवर महापालिका अधिनियमानुसार दरमहा 9 टक्के चक्रवाढ व्याज आणि 1997 पासून काम पूर्ण न केल्यामुळे पाचशे रुपये दररोजचा दंड अशी आकारणी एकूण तब्बल 42 कोटी 60 लाख 76 हजार 562 रूपये कंपनीकडून घेणे असल्याचे या फिर्यादीत नमूद केले आहे. यामुळे कंपनीने जळगाव शहर महापालिकेची वर नमूद केलेल्या रकमेची फसवणूक केली आहे. यामुळे अटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट आणि संचालकांच्या विरूध्द फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर शिंपी हे करीत आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर