Mother's Name Will On Document : आता हजेरीपत्रक आणि गुणपत्रिकेवर आईचं नाव अनिवार्य; सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र (School Education Department Maharashtra) च्या या निर्णयामुळे शासकीय, अनुदानित तसेच खासगी सर्व शाळांमध्ये एकसमान नियम लागू होणार आहे.


नव्या नियमांनुसार, विद्यार्थ्यांच्या अधिकृत नोंदींमध्ये आता आईचे नाव प्रथम, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम निश्चित करण्यात आला आहे. हा बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असून, शाळांना त्यानुसार नोंदी अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे आईच्या योगदानाला योग्य सन्मान देणे, लिंग समानतेला प्रोत्साहन देणे आणि समाजात समतोल दृष्टिकोन निर्माण करणे. अनेक वर्षांपासून अधिकृत कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावाला प्राधान्य दिले जात होते, त्यात आता बदल करण्यात आला आहे.



कोणत्या कागदपत्रांवर दिसणार आईचे नाव?


विद्यार्थ्यांच्या हजेरीपत्रक, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (LC), प्रवेश-निर्गम नोंदी तसेच इतर सर्व शालेय कागदपत्रांवर आईचे नाव अनिवार्यपणे नमूद केले जाणार आहे.



विशेष प्रकरणांसाठी तरतूद :


विभक्त किंवा घटस्फोटित पालक, सिंगल पॅरेंट, तसेच दत्तक मुलांच्या बाबतीत संबंधित परिस्थितीनुसार योग्य नोंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा प्रकरणांत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळांना लवचिकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



अमलबजावणी कशी होणार?


शाळांना त्यांच्या विद्यमान नोंदींमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. नव्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम तात्काळ लागू होईल, तर जुन्या विद्यार्थ्यांच्या नोंदी टप्प्याटप्प्याने अद्ययावत केल्या जातील. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात एक सकारात्मक सामाजिक संदेश जाणार असून, विद्यार्थ्यांच्या ओळखीत आईच्या भूमिकेला अधिक मान्यता मिळणार आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा