Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान डोंगर उतारांवर आणि बोगद्यांच्या प्रवेशद्वाराजवळ संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना ब्लॉकच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे.
नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यात शिक्षकांची ...
दरड आणि दगड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना
नागपूर-मुंबई हा सुमारे 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग महत्त्वाचा द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गावरील इगतपुरी आणि भरवीर इंटरचेंजदरम्यान काही ठिकाणी डोंगर उतार आणि बोगद्यांची प्रवेशद्वारे आहेत. या भागात दरड किंवा दगड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन एमएसआरडीसीकडून संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत. या कामामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला मदत होणार आहे.
कोणत्या वेळेत वाहतूक बंद राहणार?
इगतपुरी इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर ठरावीक वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
- सकाळी: 10 ते 11
- दुपारी: 1 ते 2
- सायंकाळी: 4 ते 5
26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे ब्लॉक घेण्यात येतील. त्यामुळे संबंधित वेळेत या मार्गावरून
नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यात शिक्षकांची ...