नसरापूरच्या ग्रामस्थांचे पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; बालिकेवर अत्याचार-खून प्रकरणाचे संतप्त पडसाद

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी मोर्चा काढून बंद पुकारला. ग्रामस्थांनी ठिय्या आंदालन केले. आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.


भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर एका गोठ्यात अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने बालिकेला दगडाने ठेचून मारले. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पूरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. या भागातील नागरिकांनी पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ’ग्रामस्थांची बाजू ऐकून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन पोलीस अधीक्षक गिल यांनी दिले.


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नसरापूर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला असून, शनिवारी सकाळी नसरापूर भागताील सर्व व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवले. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.


पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक घटना आहे. आरोपीला अटक झाली आहे. आरोपीचे अशाप्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेतून समाजातून मोठा रोष आहे. सर्वांना या घटनेमुळे पीडित मुलीच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटत आहे. आरोपीला अटक केली आहे, मी आश्वस्त करू इच्छितोो की फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊ. स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही उच्च न्यायालयाला विनंती करू. विशेष सरकारी वकील देऊन आरोपीला मृत्यूदंडाची मागणी करणार आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी