Raja Shivaji : IPS अधिकारी देखील राजा शिवाजी चित्रपट पाहून भारावले, म्हणाले..... पोस्ट झाली व्हायरल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक सिनेमे आपण आजपर्यंत पहिले आहेत. त्यातच आता या मालिकेत आणखी एक सिनेमंक जोडला गेला आहे.



हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच याची चर्चा महाराष्ट्रभर सुरु होती


विशेष म्हणजे या सिनेमात मराठी मावळ्यांचा अभिनय निभावणारे हिंदी कलाकार. महाराजांवरचा सिनेमा पाहायला आसुसलेला प्रेक्षकवर्ग राजा शिवाजी या चित्रपटाला तुफान गर्दी करत आहेत. या सिनेमात मराठी कलाकारांसह हिंदी कलाकारांची देखील फळी पाहायला मिळत आहे. त्यांचे समोर येणारे मराठमोळ्या वेषभूषेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सर्वच कलाकारांच्या तोंडून या सिनेमाचे प्रचंड कौतुक होत आहे.


अशातच आता IPS अधिकारी देखील मागे राहिले नाही आहेत. कलाकारांपासून तर आता IPS अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच स्तरातून या सिनेमाला पसंती मिळत आहे. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी देखील या सिनेमाचे कौतुक करत पोस्ट केली आहे. या ऐतिहासिक सिनेमाचे पोस्टर इंस्टाग्रामवरून शेअर करत अनेकांचे लक्ष वेधले आहे.



IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिले आहे की, " राजा शिवाजी एक अजरामर कलाकृती महाराष्ट्र दिनी ज्वलंत, धगधगता शिव छत्रपतींचा बाल, युवा अवस्थेतील दैदिप्यमान कालखंड या चित्रपटात पाहायला मिळाला. हा समर पट पाहताना अंगातील अनु रेणू स्फुल्लिंगीत होतात, रग पेटते, रक्त सळसळते आणि संवाद रोमांच उभे करतात. इतिहासाचा सखोल अभ्यास करून यातले प्रसंग उभे केलेले दिसतात, पूर्ण वेळ तुम्ही तुमची पाठ खुर्चीला टेकवू शकत नाही.


 




विश्वास नांगरे पाटील यांनी केलेल्या या भरभरून कौतुकामुळे रितेश देशमुख यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राजा शिवाजी हा सिनेमा सध्या सर्वांच्या पसंतीस पडत असून बॉक्स ऑफिसवर किती कमाई होते हे लवकरच समोर येणार आहे.


Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’