Murlidhar Mohol : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ बिनविरोध

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) अध्यक्षपदी असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्यानंतर हे पद काही काळ रिक्त होते. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात मोहोळ यांच्या निवडीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष असून या संघटनेच्या माध्यमातून त्यांची महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. त्यावेळी अध्यक्षपदासाठी अजित पवार यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, ऐनवेळी दोन्ही नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि अजित पवार यांची अध्यक्षपदी तर मुरलीधर मोहोळ यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता अजित पवारांच्या निधनानंतर मोहोळ यांनी या संघटनेची धुरा आपल्या हाती घेतली आहे.

अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावही या पदासाठी चर्चेत होते. त्यांनी नुकतेच खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून संघटनेत प्रवेश केल्याने त्यांच्या निवडीच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. पण, पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून मोहोळ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धकांवर उधळली स्तुतीसुमनं! बेबी बॉस वैभव सूर्यवंशीची अशी होती रिॲक्शन Video

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 85 पदकं मिळवून चौथं

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214