Narsapur Case : नरसापूर प्रकरणात पोलिसांकडून गफलत; कोर्टाने कान उपटताच पोलीस आले लाईनवर

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीचे बेकायदेशीर कृत्याचे जुने संदर्भही आढळले आहेत. आरोपीविरोधात पोक्सोसह (POCSO) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शिवाजीनगर कोर्टाने सात मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


आरोपी चिमुरडीला वासरू दाखवतो म्हणत गोठ्यात घेऊन गेला. यानंतर आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केला. या प्रकरणात आरोपीला फाशी व्हायलाच हवी अशी मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होत आहे. निरागस भाबड्या मुलीला वासरू दाखवायला गोठ्यात नेतो म्हणून तिच्यावर केलेले अत्याचार आणि तिचा खून ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी घटना असल्याची भावना समाजाच्या विविध स्तरांतून व्यक्त होऊ लागली आहे.




आरोपीचा कोर्टात अजब दावा


पुणे ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. आपण किती मोठा गुन्हा केलाय, लहानग्या लेकराला मारलंय याचा जराही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. न्यायालयाने आरोपीला तुझी केस काय आहे हे तुला माहित आहे का? असे विचारताच आरोपी यावर उत्तर देत म्हणाला 'मला निव्वळ एका मारामारीच्या प्रकरणात उगाचच गोवत आहेत'. हे जाणूनबुजून केलेल विसरण्याचं नाटक आहे की आणखी काही? याचा शोध लवकरच लागेल.



पोलिसांकडून झाली मोठी गफलत


आरोपीला हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी कोर्टासमोर सादर केली पण त्यात आरोपीच्या मागील गुन्ह्याची माहितीच नव्हती. आरोपीचे जुने गुन्हे न टाकल्याने पोलीस प्रशासन झोपेत काम करत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोर्टाने यावर पुणे ग्रामीण पोलिसांना कडक शब्दात सुनावलं. नंतर पोलिसांनी १५ मिनिटांत तातडीने रिमांडची कॉपी बदलली अन् कोर्टात सादर केली.




पोलीस कोठडी सुनावली


न्यायालयाने सध्या आरोपीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून लवकरच पुणे पोलीस चार्जशीट (आरोपपत्र) सादर करणार आहेत.



आरोपीवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत


आरोपीने १९९८ मध्ये विनयभंगाचा गुन्हा केला होता त्यानंतर २०१५ मध्ये त्याच्यावर पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. पण २०१९ मध्ये त्याची सुटका झाली होती. आता भोर तालुक्यातली केस फास्ट ट्रॅकवर चालणार असून पोलिसांची विशेष टीम यावर तपास करत आहेत. इतक्या संवेदनशील केसवर पोलिसांच्या कारवाई अशी गल्लत असल्याने आणखीच रोष वाढत चालला आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी