प्लेऑफशीची शर्यत रंगली ; अव्वल स्थानासाठी टॉप पाच संघात झुंज.....

IPL 2026 : आयपीएल २०२६ आता रंगतदार होताना दिसत आहे. गुणवतालिकेत अव्वल पाच संघात जोरदार सामने होत आहेत. प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी जोर लावत आहे. सध्या गुणवतालिकेत पंजाब किंग्स अव्वल स्थानावर आहे. या हंगामात पंजाबने आता पर्यंत ८ पैकी ६ सामने जिंकत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ बंगळुरू, हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात आहे. या सर्व संघांमध्ये जास्त अंतर नसल्यामुळे प्रत्येक सामना रोमांचक होत आहे. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी साधारणता १६ ते १८ गुण पुरेसे ठरतात. य़ंदाच्या हंगामात आद्यापही कुठल्याही संघाने हा आकडा गाठता आलेला नाही. अव्वल पाच संघांनी चांगली कामगिरी केली असली तरी स्पर्धेतली चुरस कायम आहे.


प्लेऑफ : कुणाला किती पॉईट्स पाहिजेत ?


आयपीएल २०२६ च्या सध्याच्या स्थितीत पंजाब हा सगळ्यात पुढे आहे. पंजाबला फक्त तीन गुणांची गरज आहे,तर आरसीबी,राजस्थान आणि हैदराबादला या तीनही संघाला चार गुणांची गरज आहे. गुजरातला उर्वरित पाच सामन्यांतून किमान सहा गुणांची गरज आहे. यासर्व टीममध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. यामुळे आयपीएलचे पुढचे काही दिवस खुपच महत्त्वाचे आहेत.


खेळाडूंची अप्रतिम कामगिरी


आयपीएल २०२६ आता मधल्या टप्प्यात आले आहे ,यात आता खेळाडूंच्याही कामगिरीत चढउतार होताना दिसत आहे. आयपीएल २०२६ मध्ये दिल्लीच्या केएल राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुल ने ९ सामन्यात ५४.१३ च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ अभिषेक शर्मा, हॅनरी कल्लासेन आणि वैभव सुर्यवंशी आहे. गोलंदाजांमध्ये आरसीबीच्या भुवनेश्वरकुमार आणि चेन्नईच्या अनशुल कॅबोजी या दोघांनी प्रत्येकी ९ सामन्यात १७-१७ बळी घेतले आहेत.
Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून