विधान परिषदेच्या ९ उमेदवारांना बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र

मुंबई : विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक अर्जांच्या छाननीनंतर सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडणुकीत दाखल झालेल्या १७ अर्जांपैकी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे अर्ज वैध ठरले असून, सूचक आणि अनुमोदक नसल्यामुळे चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.



विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राजकीय पक्षांच्या चार उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले होते, तर चार जणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत सर्वपक्षीय उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. याचबरोबर, विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरला आहे. या पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला होता; परंतु त्यावर सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरला.



उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ मे रोजी संपली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ९ ही जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यानुसार, भाजपच्या सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, राष्ट्रवादी काँग्रेस झिशान सिद्दिकी आणि उबाठाच्या अंबादास दानवे यांना बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय