Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : महामार्ग प्राधिमंत्री नितेश राणे यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगितीकरणाच्या अभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली आहे.


सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयाने राणे यांना एक महिन्याच्या कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला. मंत्री नितेश राणे यांच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांनी काम पाहिले.




नेमके प्रकरण काय ?


४ जुलै २०१९ रोजी मुंब महामार्गाच्या चौपदरीकरणई-गोवा कामाची पाहणी करताना कणकवलीचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलावून घेतले होते. पाहणीदरम्यान कणकवली गडनदी पुलावर शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता.


- या प्रकरणात जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी नितेश राणे यांना कलम ५०४ अन्वये दोषी ठरवून एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तर अन्य २९ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या शिक्षेविरोधात राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी