नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या २३६ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन २०२६-२७ च्या सुमारे २३६.०७ कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. तसेच प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रस्तावित नाशिक रिंगरोड (परिक्रमा मार्ग)च्या लगतच्या दोन्ही बाजूस टप्प्याटप्प्याने नगर रचना योजनेच्या माध्यमातून बाह्य वळण रस्ता प्रभाव क्षेत्र म्हणून विकसित करण्यासही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मान्यता दिली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (Nashik Metropolitan Region Development Authority) दुसरी वार्षिक बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर दराडे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एनएमआरडीएचे महानगर आयुक्त जलज शर्मा आदी उपस्थित होते. श्री. शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला..


यावेळी सन २०२५-२६ च्या सुमारे ४५४.५ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पासही यावेळी मान्यता देण्यात आली. यावेळी एनएमआरडीएच्या कार्यालयासाठी स्वतःची इमारत खरेदी करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या भूखंड विल्हेवाट नियमावली व जाहिरात फलक धोरणास मंजुरी देण्यात आली. तसेच शासकीय जमिनींच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार संस्था नेमणे, तसेच विकास योजनांअंतर्गत जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली.


नाशिक महानगर प्रदेशाच्या प्रभावी नियोजन व विकास मार्गदर्शनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन तसेच इतर नगर रचना क्षेत्रातील शासकीय मान्यता प्राप्त संस्थांना ज्ञान भागीदार म्हणून नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री श्री. फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. यावेळी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दवाढीसंदर्भातही चर्चा झाली.

Comments
Add Comment

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी