Nitesh Rane : सेक्युलरिझम ही काँग्रेसने निर्माण केलेली कीड; मंत्री नितेश राणे यांचा घणाघात

- हिंदुराष्ट्रात हिरव्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही


मुंबई : ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द मूळ संविधानाचा भाग नसून, ती काँग्रेसने निर्माण केलेली कीड आहे, असा घणाघात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रविवारी केला. तसेच, भारत हा देश हिंदू राष्ट्र होता, आहे आणि यापुढेही हिंदू राष्ट्रच राहील, असेही ते म्हणाले.


संघर्ष नगर, चांदिवली येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. यावेळी हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन करताना राणे म्हणाले, हिंदू समाजाने आपली ताकद ओळखण्याची वेळ आली असून, प्रत्येक आव्हानाला संघटित होऊन उत्तर देणे ही काळाची गरज आहे. या भारत देशात ९० टक्के हिंदू राहतात. त्यामुळे येथे सर्वात आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल, त्यानंतरच इतरांचा विचार होईल. कोणालाही काहीही टीका करू द्या, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, असे राणे यांनी ठणकावून सांगितले.



स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम : 

"काही लोक असा दावा करतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे 'हिंदू विरुद्ध मुसलमान' अशा संघर्षावर आधारित नव्हते. पण, हा दावा करणाऱ्यांना माझा एकच सवाल आहे - जर ही लढाई केवळ राजकीय होती, तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारताना, 'धर्मांतर करा आणि जीवदान घ्या', अशी अट का घातली होती? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे का?", असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण