Rahuri Bypoll Election 2026 Result : भाजपाच्या अक्षय कर्डिले यांचा एकहाती विजय; आठव्या फेरीअखेर ४६ हजारांपेक्षा अधिक मतांची निर्णायक आघाडी

राहुरी : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले.



बारामतीत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा अजित पवार या पोटनिवडणुकीला उभ्या होत्या. अजित पवारांचा वारसा त्यांची पत्नी या नात्याने आता सुनेत्रा पवारांच्या हाती आहे. त्यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवली. तर राहुरीत शिवाजीरावांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत.


पश्चिम बंगाल, आसाम, तमीळनाडू सोबतच बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही आज म्हणजेच सोमवार ४ मे रोजी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी बारामती येथील गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत पहिला कल आणि दुपारपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे.



त्यानुसार आता ८ व्या फेरीनुसार भाजपचे अक्षय कर्डीले आघाडीवर आहेत. अक्षय कर्डीले यांना ४६ हजार ४०५ मतांची आघाडी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांना आता पर्यंत ४४१७ मते मिळाली आहेत. यावरूनच मतदारांनी अक्षय कर्डीले यांना एकतर्फी कौल दिल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत ३९ हजार ८१२ मतांची झाली मोजणी पूर्ण झाली आहे. या ३९ पैकी ३३ हजार मतं अक्षय कर्डीले यांना मिळाली आहेत.



यावरून राज्यातील दोन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये महायुतीचीच सरशी होत असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण