Sunetra Pawar : "विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये"; सुनेत्रा पवार यांची भावनिक साद

बारामती : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले.


बारामतीमधून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बहुमताने विजय मिळवला. तर राहुरीमधून अक्षय कर्डीले यांच्या एकहाती विजयामुळे महायुतीचीच सरशी होत असल्याचे चित्र आहे.



अशातच विजयानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी X वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक साद घातली आहे. "विजयाचा जल्लोष म्हणुन कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये" अशी साद त्यांनी घातली आहे.



नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?


आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.



आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.



दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे.
निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!




Comments
Add Comment

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन